logo

सागवनच्या भूमिपुत्राची मुलगी झाली कलेक्टर

डॉ. कु. नेहा उद्धवसिंग राजपूत युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण
_बुलढाणा, 16 एप्रिल
:_ बुलढाण्याच्या भूमिपुत्राच्या कन्येने प्रगतीच्या आकाशाला गवसणी घातली आहे. सागवन येथील उद्धवसिंग राजपूत यांची कन्या कु. नेहा हिने यूपीएससी परीक्षेमध्ये 51व्या रँकिंगसह दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. नेहा हिचे संपूर्ण शिक्षण जळगाव येथे झाले आहे. मुंबई येथे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण झाले आहे. आपल्या प्रतिनिधीला प्राप्त माहितीनुसार डॉ. नेहा यांचे वडील उद्धवसिंग हे जळगाव येथे समाज कल्याण विभागामध्ये नोकरीवर कार्यरत होते. ते आता सेवानिवृत्त आहेत. उद्धवसिंग यांची शेती आणि घर सागवन मध्येच असून डॉ. कु. नेहाच्या यशाने त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच डॉ. कु. नेहा यांचा बुलढाणा शहरात सत्कार आयोजित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये यूपीएससीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर जानेवारी ते एप्रिल 2024 दरम्यान यूपीएससीच्या मुलाखती पार पडल्या. सदर परीक्षेचे निकाल आज 16 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले आहेत. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2023 अंतर्गत आयएएएस, आयपीएस सहित सर्व्हिसेसमध्ये 1143 पदांची भरती निघाली होती. यामध्ये आयएएसच्या 180 जागा, आयपीएसच्या 200 तर आयएफएसच्या 37 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.

110
2742 views